'पोटचं पोर ऐकत नाही', याचसाठी का याला कळता सवरता केला? याचसाठी का याला शाळेत पाठवून अंक ओळख अक्षर ओळख करून दिली, कुणाच्याच आयुष्यात कधी घडला नसेल असा प्रसंग दादांच्या आयुषयात ओढवला होता, गोविंदा फुलेना (दादा) रस्त्यावर बाहेर पडणे म्हणून अवघड झाले होते, कारणही तसेच होते गोविंदाच्या मुलाने 'जोतीने' पेटवलेली शिक्षणाची मशाल अशी काही प्रखरतेने पेटली होती की अवघे पुणेरी ब्रम्हतेज त्यापुढे फिके पडले होते. जमिनीकडे नजर लावून बसलेला गोविंदा आपल्या विचारांत मश्गुल असतानाच बाहेर अंगनातून आरोळ्या कानी आल्या.
"गोविंद्या घरी आहेस ना ?"
बाहेरुन आलेल्या आवाजासरशी दादा त्यांना सामोरे गेला.
"या जी महाराज"
दादा एखाद्या अपराध्यासारखेच येऊन सार्यांच्या पुढे उभे राहिले .
"शिंच्या तुझा मुलगा तर तुझे ऐकत नाही तर, निदान तुझ्या सुनेला तरी आवर. ही रे थेरं कशाला पाहिजेत तुमच्या जातीला?"
जोतिबा फुलेंच्या वडिलांना देव, धर्म, समाज सार्या गोष्टींची भीती घालून आलेले धर्माचे ठेकेदार चालते झाले, यानंतर घरी झालेल्या धुमश्चक्रीत सावित्री माई यांनी कपड्याचे बोचके तर जोतिबांनी पुस्तक, वह्या, पाट्या होते नव्हते ते शिक्षणाचे सारे समान गोणपाटात भरले अन सदैव आपल्याचं भल्यासाठी समजाच्या रोषाला घाबरणार्या आपल्या आई-वडिलांचे पाय धरून उभयंतांनी घर सोडले.
कुठे जायचे हे अद्यापही ठरले नसताना पावले गंजपेठ मधील आपला साथीदार उस्मान शेखच्या घराकडे वळाली, याच उस्मान शेख यांच्या भगिनी फातिमा यांनी सावित्रीमाई - जोतीराव यांच्या शिक्षण चळवळीत सामील होऊन समाजासाठी असामान्य कर्तृत्व करण्याच्या दिव्यात स्वतःला झोकून दिले आणि यातूनच आधुनिक भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होण्याचा मान ज्ञानज्योती फातिमा शेख यांना मिळाला.
सावित्रीमाई फुलेंच्या सहकारी, भारतातील पहिल्या मुस्लीम शिक्षिका #फातिमा_शेख यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐