Monday 29 May 2023

सागरा प्राण तळमळला

******************************

*गीत : सागरा, प्राण तळमळला*
*रचना : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*
********************************


लहानपणासून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'सागरा प्राण तळमळला' हे गीत आवडायचे . त्यावेळी देशप्रेमाबद्दलची तळमळ कळायची . गीत तसे अवघड वाटत होते  . माहित नाही ह्या गीताचे रसग्रहण करण्याची माझी योग्यता आहे की नाही परंतु माझा छोटासा प्रयत्न कांही चुकल्यास मोठया मनाने माफ करावे ही नम्र विनंती .

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननी-हृद्‌ विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वरे कथुन सोडिलें तिजला
सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते जी सरिता । रे
त्वद्‌विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

 या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

*******************************
*रसग्रहण* 

 ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननी-हृद्‌ विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वरे कथुन सोडिलें तिजला
सागरा, प्राण तळमळला

स्वातंत्र्ययवीर सावरकर अंदमान तुरुंगात असताना देशप्रेमाने हृदयाने सागराला उद्देशून म्हणतात, हे सागरा मला परत मातृभूमीला घेऊन जा . मातृभूमीच्या ओढीने माझा प्राण तळमळत आहे . हे सागरा तू सुद्धा मातृभूमीवर आई सारखे प्रेम करतोस दैवत मानतोस ,रोज भूमातेचे चरण रोज धुऊन तिची सेवा करतोस, तु करत असलेली तिची नित्यपूजा मी पाहिली आहे . इतके प्रेम तु मायभुमीवर करतोस आणि मला  तू अन्य देशाला जाऊ असे म्हणतोस आणि सृष्टीचे वैभव पाहू , सृष्टीची विविधता पाहू . अन्य देशाचे आमिष मला दाखवू नकोस . मला माझी भारतभूमी मातृभूमी आहे . बघ मायभूमी काय म्हणत आहे ....
तुझ्या अशा म्हणण्याने ती जननी हदयातून माझ्या विरहाने तुझ्या विषयी शंका करते , तिचे माझ्यावरचे प्रेम मला माहित आहे . म्हणूनच मला वचन देते की , मला ती परत 
माझ्या मातृभूमीला माझे तिच्यावर असलेले निस्सिम प्रेम तिला माहित आहे . म्हणूनच मातृभूमी मला म्हणते .
हे सागरा मातृभूमीच्या मार्गात मी स्वतः पुष्पे वाहिले आहे . म्हणजेच माझा मातृभूमीला जाणारा मार्ग सुखकर केला आहे . तिने मला वचन दिले आहे . मला त्वरीत मातृभूमीला घेऊन जाणार आहे . माझे आंतर्मन मला सांगत आहे . मला माझ्या मातृभूमीवर विश्वास आहे . ती मला सुखरूप मातृभूमीला घेऊन जाणार . तिने मला वचन दिले आहे . त्या वचनाचा मला दृढविश्वास आहे. मातृभूमीनी माझ्यावर केलेले प्रेम , विश्वास हयामुळे जगापुढे एकअनुभव होणार आहे . ह्याच विश्वासाने मातृभूमीची अधिक चांगली सेवा माझ्या हातून घडणार आहे .
तिला मी सांगितले आहे मी परत लवकरात लवकर येणार आहे . त्यासाठी हे सागरा माझा प्राण तळमळला आहे . मला परत माझा मातृभूमीला घेऊन जा ......


शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला


पोपट पिंजऱ्यात आणि हरिण पारध्याच्या जाळयात सापडावा तशी मी सुद्धा फसलो आहे . मातृभुमीचा विरह मी ह्या पुढे कसा सहन करू  , हे सागरा बघ दाही दिशा तेजोमय झाल्या आहेत . म्हणूनच मी तिच्या गुणांची सुमने मी तुझ्या समोर व्यक्त करत आहे . म्हणूनच हे सागरा माझ्या  मातृभूमीने मी तिच्यासाठी गायलेल्या पुष्प गुणांचा सुगंध घ्यावा. तिचे गुणगान करण्यास मी कमी पडलो . तर माझ्या विद्येचा व्यर्थ भार मला होणार आहे .
हे सागरा बघ माझ्या मातृभूमीची आम्र वृक्षावरील वत्सलता आहे , नव सुमने ही फुलली आहे , तो लहान गुलाब फुलला आहे . मातृभूमीच्या हया नयन सुंदर सोहळयास मी पारखा झालो आहे म्हणूनच हे सागरा माझा प्राण तळमत आहे . मला माझा मातृभूमीकडे घेऊन चल...... हे सारे नेत्रसुख मला जवळवून अनुभवायचे आहे .


नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते जी सरिता । रे
त्वद्‌विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला

येथे तरी नभामध्ये नक्षत्र सुंदर दिसत असतील . तरी मला माझा भरतभूमीचा तारा प्रिय आहे . येथे जरी राहण्याचे ठिकाण चांगले महाल असले तरी माझ्या मातृभूमीची झोपडीच मला प्रिय आहे . तुझ्याशिवाय कोठे ही प्रिय वाटत नाही , तिच्या शिवाय कोणतेही राज्यात मला आनंद वाटणार नाही .
माझ्या मातृभूमीत मला जरी माझ्या वाट्याला वनवास आला तरी मला तो प्रिय आहे . ह्या ठिकाणचे निसर्ग नक्षत्र , तारे मला भुलवू शकणार नाहीत . जिवलग खुप ह्या  निसर्ग सौदर्यात मला भुलत आहेत . पण मी भुलणाऱ्यापैकी नाही .
 हे सरिता पती सागरा.......  , तुझे जसे सरिता वर प्रेम आहे .सरिताला तुझ्या मिलनाची ओढ आहे म्हणूनच ती धावत तुला येऊन भेटते . जर तु मला माझ्या मातृभूमीला घेऊन जाणार नाहीस तर मी तुला तुमच्या विरहाची शपथ घालतो . मला जसा मातृभूमीचा विरह झाला आहे तसा तुला ही सरितेचा विरह होईल अशी मी तुला विरहाची शपथ घालीत आहे . म्हणून हे सागरा मातृभूमीला भेटाया माझा प्राण तळमळत आहे....
मला मातृभूमीला भेटण्यास घेऊन चल ....


या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

भारतमातेला वचन दिले होते की , तु मला परत मातृभूमीला घेऊन जाणार हे वचन तु मोडून हे सागरा निदर्या सारखं तु हसत आहेस. तु येथे गुलाम सारखा आहेस म्हणूनच तु ह्या सत्ताधाराला गुलामगारांना भीत आहेस . म्हणून माझ्या मातृभूमीला मातृभूमीला तु फसवत आहेत . तु घेतलेली शपथ तु़ जर मोडलतीस तर तुझाही सरिताशी वियोग होईल 
त्यामुळे येथील आंग्ल भूमी सुद्धा भयभीत होणार आहे .

तुला मी ह्या पुढे अगस्ती ऋषीची आठवण करून देतो . अगस्ती ऋषीने तुला एक क्षणी एका प्याले प्रमाणे पिऊन टाकले होते .
तुझे अस्तित्व नष्ट केले होते . सर्वांनी तुझ्यासाठी प्रार्थना केली म्हणून तुला सोडून दिले . म्हणून तुझे अस्तित्व तुला पुन्हा मिळाले . इतका रुबाब गर्व करू नकोस . अगस्ती ऋषी वारसा लाभलेला मी भारतमातेचा पुत्र तुला पुन्हा धडा शिकवू  हे ऐकून तर .....

मला माझा मातृभूमीकडे घेऊन चल .
सागरा माझा प्राण तळमळत आहे.....

श्रावण

*श्रावण....🔸* *तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे स...