Tuesday, 28 February 2023

पी एन एन पणिक्कर

पुथुवाययल नारायणा पणिक्कर (पी. एन. पणिक्कर) यांचा जन्म १ मार्च १९०९ रोजी नीलमपरूर येथे झाला. पुथुवाययल नारायणा पणिक्कर यांना केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचा जनक म्हणून ओळखले जाते.

कार्य

त्यांनी आपल्या गावी शिक्षक म्हणून सनातनधर्म ग्रंथालय सुरू केले होते.

  • त्यांनी १९४५ मध्ये त्यांनी ४७ ग्रामीण ग्रंथालयांसह तिरुविथामकूर ग्रंथशाला संघम (त्रावणकोर लाइब्रेरी असोसिएशन)ची स्थापना केली होती.
  • त्यांनी केरळमधील खेड्यातून ते गावोगावी प्रवास करून लोकांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. अशा प्रकारे ते त्याच्या नेटवर्कमध्ये ६०००हून अधिक ग्रंथालये जोडण्यात यशस्वी झाले होते.
  • १९७५ मध्ये ग्रंथशाला संघमला युनेस्को कडून 'कृपसकय अवॉर्ड' देण्यात आला. पणिक्कर एकूण ३२  वर्षे ‘केरला ग्रंथशाला संघम’चे वर्ष १९७७ पर्यंत सरचिटणीस होते.
  • वर्ष १९७७ मध्ये त्यांनी केएनएफईडीची स्थापना केली. केएनएफईडी हे केरळ राज्य साक्षरता अभियान सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावत होते आणि यामुळे केरळला सार्वत्रिक साक्षरतेच्या चळवळीकडे नेले गेले. अशा प्रकारे, केरळ हे सार्वत्रिक साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य बनले.
  • पणिक्कर यांनी अ‍ॅग्रीकल्चरल बुक्स कॉर्नर, द फ्रेंडशिप व्हिलेज मूव्हमेंट (सौरुडग्राम), कुटुंबांसाठी वाचन कार्यक्रम, पुस्तके व अनुदान ग्रंथालयांचे अनुदान आणि बेस्ट रीडर अ‍ॅवॉर्ड पी.एन. पॅनीकर फाऊंडेशन इत्यादी कार्यास प्रोत्साहन दिले.

सन्मान / गौरव

  • त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त १९ जून हा केरळमध्ये वर्ष १९९६ पासून वायनादिनम् (वाचन दिन) म्हणून पाळला केला जातो. केरळमधील शिक्षण विभागा मार्फत देखील त्यानिम्मित १९-२५ जुन वाचन सप्ताह पाळला केला जातो.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१७ मध्ये  १९ जून हा केरळचा ‘वाचन दिन’ हा राष्ट्रीय वाचन दिन म्हणून घोषित केला.
  • पणिक्कर यांचे १९ जून १९९५ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. केरळ सरकारने त्यांच्या साक्षरता, शिक्षण आणि ग्रंथालय चळवळीच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी १९ जून हा वायनादिन (वाचन दिवस) म्हणून साजरा करावा, असा आदेश दिला. २१ जून २००४ रोजी टपाल विभागाने स्मारक टपाल तिकीट जारी करून पानिकरचा सन्मान केला.
  • २०१० मध्ये पी एन एन पणिक्कर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली गेली.

Monday, 27 February 2023

राष्ट्रीय विज्ञान दिवस

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.

1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. 1999 मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना, 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना तर 2013 मध्ये मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला.

चालू वर्षामध्ये ‘खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक ठिकाणी चांगले संभाषण, विविध संशोधने शास्त्रज्ञांची चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे. नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक चांगला फायदा होत आहे.

आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा....!

Sunday, 26 February 2023

मराठी भाषा गौरव दिन


 
  

मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
 कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. 
 कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या या रुपात सुंदर साहित्य तयार केलं. 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कवितासंग्रह, विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणीपैकी एक आहे. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली. 
 महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो. 
 मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके. अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
 
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते.
 
आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्तव टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणार्‍या पिढील मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल.
 
आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी तसेज जोपसण्यासाठी प्रयत्न करावेत. 
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

Wednesday, 15 February 2023

14 फेब्रुवारी

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*१४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा मध्ये
 शहीद जवानांना शब्दरूपी भावपुर्ण आदरांजली*🙏🏻🙏🙏


*ईश्वर ,अल्लाह तेरे नाम सबको सन्मती दे भगवान I*


पुलवामा येथे झालेल्या आंतकी हल्ल्याने मन खिन्न झाले .
    कशासाठी हा रक्तपात ?
ह्या प्रश्नाने मन उदास होते  . खरंच कशासाठी हा रक्तपात
काश्मीरसाठी ?
हे मानवा मृत्यूनंतर तू काय घेऊन जाणार आहेस
कांहीच नाही ना !
मग हे कशासाठी ?
माझे माझे सर्व येथे ची राहिले . ह्या अगोदर आपले पुर्वज मृत्यूनंतर काय घेऊन गेले का? नाही ना ! 

*सजन रे ! झूठ मत बोलो* 
*खुदा के पास जाना है I*
*ना हात्ती , ना घोडा है I*
*वहाँ पैदल ही जाना है ।*

*हे जीवनाच अंतिम सत्य आहे .*
मग आपण काय घेऊन जाणार आहोत . जाताना फक्त एकच गोष्ट आपल्यासोबत येणार आहे ती म्हणजे माणुसकी .
धर्माच्या नावाखाली युवा पिढीला चुुकीचा मार्गदर्शन केले जात आहे . म्हणे 

*आतंकवाद केल्यास जन्नत मिळते .* *स्वर्गातील अप्सरा सेवा करतात .*
*सबकुछ झूठ है I*

तरूणाईने विचार करायला हवा . खरंच स्वर्ग असेल का ? अप्सरा असतील का ? 
आपल्या आईवडिलांशी कधी खोटे बोलू नका . काबाडकष्ट करून तुम्हाला लहानाच मोठं केलं ते ह्यासाठी . म्हणजे आतंकवाद करण्यासाठी ?निष्पाप लोकांचा बळी घेण्यासाठी ?
     खरा स्वर्ग जर कोठे आहे तर तो आपल्या आसपास , माणसामाणसाच्या मनात , आई वडिलांच्या सेवेत , आपल्या कार्यात आपल्या वर्तणूकीत , माणुसकीत .

   मानव जन्म एकदाच येतो . कोणी पाहिले आहे दुसरा जन्म नाही ना !
म्हणूनच 
*ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे .*
 गीतकार मंगेश पाडगांवकर यांचे गीत .
खरचं ह्या जन्मावर माणसाने प्रेम केले पाहिजे तसेच जगण्यावर वर ही प्रेम केले पाहिजे .
  जातीयवाद समुळ नष्ट करू.झाले गेले सर्व कांही विसरूयात पुन्हा नव्याने आनंदाने राहूयात . फक्त आणि फक्त एकच जात ती म्हणजे मानवता एकच धर्म मानवता . धर्माच्या नावाखाली करत असलेलाआतंकवाद थांबवा . रक्तापात थांबवा अन्यथा सर्वनाश अटळ आहे . अजूनही वेळ गेलेली नाही . आपल्या घरी परत या ! आपल्या वडिलांच्या चरण सेवेत स्वर्ग आहे . तो स्वर्ग पहा आपल्या कर्मात सर्व सुख आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा .
प्रेम ह्या दोन शब्दातच स्वर्गाचे सुख आहे . माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागवावे .
*खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम शिकवावे .*
 साने गुरुजींची प्रार्थना .
परवा झालेल्या पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड हल्ला पाहून मन खिन्न झाले . मनामध्ये आलेले असंख्य विचार कागदावर मांडले आहेत मी कांही मोठी विचारवंत लेखिका कवयित्री नाही , मला जे वाटलं ते लिहलं वरील सर्व लेखाचा विचार करा आपले जीवन सुधारा हिच ईश्वर , अल्लाह चरणी प्रार्थना
*ईश्वर ,अल्लाह तेरे नाम सबको सन्मती दे भगवान I*

*भारत माता की जय*
*जय हिंद जय भारत*

Monday, 13 February 2023

  Mahatma Jyotirao Phule was a prominent social reformer known for his advocacy of education and equality.  Here are some of his famous quot...