Monday 17 July 2023

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्राला थोर समाजसुधारक, विचारवंत, कवी, संत, साहित्यिक अशी परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळकवि.दा. सावरकरसंत तुकाराम अशी अनेक रत्ने आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. यांतील प्रत्येकाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु अशी कुठली व्यक्ती आहे जी या सर्व उपाध्या धारण करू शकते? कुठली एक अशी व्यक्ती आहे जिने या सर्व क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान दिले आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे.

लोकशाहीर म्हटलं कि सुरुवातीला आठवणारं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

“जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव”

समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले.

नाव (Name)तुकाराम भाऊराव साठे (Tukaram Bhaurao Sathe)
जन्म (Birth)१ ऑगस्ट १९२० (1st August 1920)
टोपण नाव (Nick Name)अण्णाभाऊ (Annabhau)
जन्मस्थान(Birth Place)वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली (Vategaon, Tq. Valva, Dist. Sangali)
वडील (Father Name)भाऊराव (Bhaurao)
आई (Mother Name)वालबाई (Valbai)
शिक्षण (Education)अशिक्षित (Uneducated)
पत्नी (Wife Name)कोंडाबाई आणि जयवंताबाई (Kondabai and Jayvantabai)
मृत्यु (Death)१८ जुलै १९६९ (18th July 1969)

१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. त्यांच्या बहिणीचे नाव जाईबाई असून भावाचे नाव शंकर भाऊ साठे असे आहे. अण्णाभाऊ यांनी दोन विवाह केले.

त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता असे होते. त्यांना एकूण तीन अपत्ये असून त्यांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला अशी आहेत. अण्णाभाऊ यांचे मूळ नाव तसे तुकाराम परंतु संपूर्ण जग त्यांना अण्णाभाऊ या टोपणनावानेच ओळखते. भाऊंचे शिक्षण तसे झालेले नव्हते, परंतु तरीही कठोर प्रयत्नांतून त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केले.

मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली.

“गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची”

आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले.

तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची ‘वैजयंता’ हि कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटीशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारी ‘फकीरा’ ह्या त्यांचा काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

त्यांच्या ‘फकीरा’ या कादंबरीला १९६१ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन हे अण्णाभाऊ यांची विशेषता. शिवाय ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना कळेल अशा भाषेत त्यांनी पोवाडे, लावण्या व गीते लिहिली.

अण्णाभाऊ साठे यांच्या काही खास कविता 

“माझी मैना गावावर राहिली,

माझ्या जीवाची होतीया काहिली”

“दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक

दे शेजाऱ्याला, रे शिवारी चला”

“रवी आला लावूनी तुरा,

निघाली जिंदगी भरभरा

दीप गगनाच्या डोईवर लागला,

ढग तिमिराचा त्यानं

निवारिला झाले आकाश लाल,

                                                               बघ उधळी गुलाल रानारानात हर्ष पसरला,

आला बहार गुलमोहरा”

“एकजुटीचा नेता झाला कामगार तैय्यार बदल्या रे

दुनिया सारी दुमदुमली ललकार”

लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्या

  • आबी,गुलाम,जिवंत काडतुसे,पाझर रानगंगा,वारणेचा वाघ,वैर,फकीरा,वैजयंता,चिखलातील कमळ,माकडीचा माळ,चंदन इ.
  • अण्णाभाऊ साठे यांचे कथा संग्रह
  • कृष्णा काठच्या कथा,गजाआड,नवती,खूळंवाडा,आबी,पिसाळलेला माणूस,फरारी,बरबाद्या कंजारी,निखारा,चीरानगरची भूतं इ.
  • अण्णाभाऊ साठे यांचे लोकनाट्य : बेकायदेशीर,लोकमंत्र्यांचा दौरा,पुढारी मिळाला,देशभक्त घोटाळे,कापऱ्या चोर,अकलेची गोष्ट,शेटजींचे इलेक्शन इ.

  • अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली पुस्तके: अमृत,गुऱ्हाळ,तारा,रानबोका,आघात इ

9 comments:

श्रावण

*श्रावण....🔸* *तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे स...