आपल्या महाराष्ट्राच्या मातीने या देशाला भरभरून दिलं, याच महाराष्ट्राच्या मातीने अशी काही रत्न जगाला दिली, ज्यांची आठवण आजही काढली जाते व इथून पुढचे शंभर वर्ष देखील काढली जाईल यात दुमत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका अवलिया बद्दल सांगणार आहोत, ज्याचे आयुष्य म्हणजे फक्त लोकांचं निखळ मनोरंजन...!!
महाराष्ट्राचे लाडके असलेले, वक्तृत्वावर उत्तम पकड असलेले, नाटककार, संगीतकार, उत्तम अभिनय करणारे, ज्यांचं विनोदी वांग्मय अवघ्या महाराष्ट्राला आजही खळखळून हसायला भाग पाडतं, असे एकमेव अवलिया, आपल्या सर्वांचे लाडके भाई, म्हणजेच पद्मभूषण “ पु. ल. देशपांडे".
पु.ल.देशपांडे यांचे पूर्ण नाव "पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे" आहे. 8 नोव्हेंबर 1919 रोजी पु.ल. यांचा जन्म मुंबईतील गावदेवी परिसरात झाला. पण त्यांचे बालपण जोगेश्वरी मधील सारस्वत कॉलनी मध्ये बहरले. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण हे पार्ले टिळक विद्यालयात झालं. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले, व पुण्यातील सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज आणि सांगली मधील विलिंग्डन कॉलेज येथे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले लहानपणापासूनच पु.ल. अगदी धष्टपुष्ट होते, वयाच्या दुसऱ्या वर्षी सुद्धा ते पाच वर्षाच्या मुला एवढे दिसत असत.
पु.लं. यांचे वडील “ अडवाणी " कागद कंपनीमध्ये फिरते विक्रेते होते त्याचबरोबर त्यांची आई गृहिणी होती. एकदा पु.लं. यांच्या आजोबांनी स्वतः लिहिलेलं एक भाषण पुलंना पाठ करून बोलून दाखवायला सांगितलं . तेव्हा पुलं यांचं वय अवघं 5 वर्ष होतं .
छोट्या पुलंनी ही जबाबदारी स्वीकारली, मी काहीच वेळात भाषण पाठ करून हातवारे करून, बोलून देखील दाखवलं. पुलंच वकृत्व पाहून त्यांचे आजोबा देखील चाट पडले. पु लं च्या घरी संगीताची आवड सगळ्यांना होती. आणि म्हणूनच संगीताचे देखील बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांच्या आजोबांना पेटी वाजवताना बघून पुलं सुद्धा अगदी लहान वयातच पेटी वाजवायला शिकले.
त्यांचा पेटीवर एवढा हात बसला होता की एकदा बालगंधर्व यांच्यासमोर त्यांना पेटी वाजवण्याची संधी मिळाली होती, व लहान पु.लं. ना पेटी वाजवताना बघून स्वतः बालगंधर्वांनी देखील त्यांना शाबासकी दिली व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.वयाच्या बाराव्या वर्षापासून पुलं स्वतः भाषणे लिहायला लागले. बऱ्याच वेळा ही भाषणं पु. लं. स्वतः लिहून सादर करत तर कधीकधी इतर लोकांना देखील ही भाषण लिहून देत असत. लहानपणापासूनच पु.ल. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करायचे, आजूबाजूचे लोक, घरात आलेले नातेवाईक, यातील जर त्यांना कोणी हास्यास्पद वाटलं तर ते त्यांची नक्कल करायचे. आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना खटकायची सुद्धा. नक्कल करता करता त्यांनी यानंतर विनोदी लिखाण करायला सुरुवात केली
👍
ReplyDelete👍
ReplyDelete👍
ReplyDelete👌
ReplyDelete✌🏻
ReplyDelete👍
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete👌
ReplyDelete