Tuesday, 11 April 2023

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११ , इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८९० या साली मिळाली. शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहला.
बालपण आणि शिक्षण
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
शैक्षणिक कार्य
महात्मा फुल्यांच्या कवितेतल्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

“ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।”
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली. जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले (?) भारतीय होत.सत्यवर्तन करणारे म्हणावे .

स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात , परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणार्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

महात्मा फुले यांनी मानवास सत्यधार्माचा जो बोध केला त्यातील हि काही वचने आपण वाचली कि लक्ष्यात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणार्या माणसाला माणूस म्हनून प्रतिष्टा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाटी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडऊन आणायचा होता .त्यासाटी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवाचा धर्म , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णूता , सदसदविवेक , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता , इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे . ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले , मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला , त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे . ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात ,
सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||
न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||
धर्म राज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||
सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||
दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोतापुर्ते ||१||

खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||



सत्याविन नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१||



सत्य सोडू जाता वादामध्ये पडे | बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||



सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३||



मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||



सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता ||



जेथे आहे ||१|| जेथे जागा धीर सदा हृदयात ||



सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||



पिडा दु:खे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामागी ||३||



धीर धरूनिया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||

1 comment:

  Mahatma Jyotirao Phule was a prominent social reformer known for his advocacy of education and equality.  Here are some of his famous quot...