Tuesday 28 March 2023

29 मार्च दिनविशेष

जागतिक दिवस:

  • बोगांडा दिन : मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक.
  • युवा दिन : तैवान.
  • राष्ट्रीय नौका दिवस

महत्त्वाच्या घटना:

१५६१: मुघल बादशाहा अकबर यांनी मालवा प्रांताची राजधानी ‘सारंगपूर’ येथे हल्ला करून तेथील सुलतान बाजबहादूर यांचा पराभव केला.

१८४९: ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.

१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७: क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.

१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.१९३०: ’प्रभात’चा ’खूनी खंजिर’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९४२: क्रिप्स योजना जाहीर

१९५४: भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेली संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘भारतीय लोक प्रशासन संस्था’ ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे प्रथम अध्यक्ष टी. एन. चतुर्वेदी होते. तसचं, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहे.

१u९६२: भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.


२००४: भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला.


२००४: आयर्लंड देशाने कामाच्या ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली. अश्या प्रकारची बंदी लागू करणारे ते जगातील पहिले राष्ट्र ठरले. २९ मार्च या तारखेपासून सार्वजनिक आरोग्य (तंबाखू) अधिनियमांतर्गत बंद असलेल्या कार्यलयाच्या परिसरात धूम्रपान करणे बेकायदेशीर ठरले आहे.


२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.


जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६९: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (मृत्यू: १ जानेवारी १९४४)


१९१३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेता हिंदी भाषिक कवी व लेखक भवानी प्रसाद मिश्रा यांचा जन्मदिन.


१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)


१९२६: पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (मृत्यू: २१ मार्च २०१०)


१९२८: भारताचे परराष्ट्र सचिव तसेच, दिल्ली, अंदमान आणि निकोबार या केंद्र्शाशित प्रदेशाचे माजी उपराज्यपाल. याचप्रमाणे त्रिपुरा, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे माजी राज्यपाल रोमेश भंडारी यांचा जन्मदिन.


१९२९: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (मृत्यू:१९ ऑगस्ट १९९३)


१९३०: अनिरुद्ध जगन्नाथ – मॉरिशसचे पंतप्रधान

१९३९: प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व हास्यकलाकार सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ जगदीप यांचा जन्मदिन.

१९४३: जॉन मेजर – इंग्लंडचे पंतप्रधान

१९४८: नागनाथ कोतापल्ले – साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

१९९८: भारतीय व्यावसायीक गोल्फ खेळाडू अदिती अशोक यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)

१९६२: करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.

१९६३: प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार व राष्ट्रकवी सियारामशरण गुप्त यांचे निधन.

१९६४: शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक

१९७१: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)

१९९७: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)









 










No comments:

Post a Comment

श्रावण

*श्रावण....🔸* *तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे स...