Friday, 3 January 2025

क्रांती ज्योती सावित्रीबाई


क्रांती ज्योती सावित्रीबाई 
ओव्या 

पतीच्या साथीने माये,तूही खंबीर झालीस
वसा शिक्षणाचा घेऊन, ज्ञानाने पूढे पूढे गेलीस

माय माझ्या सावित्रीने, ज्ञान ज्योत पेटवली
तुझ्या महान कार्यांन ,मान स्त्रीची उंचावली

वसा शिक्षणाचा देऊन ,लढा दिला संघर्षाला
आळा घातला रुढींना ,क्रुर अशा त्या चालीला

दिली सात ज्योतीबाला, खंबीर अशी पाठीशी
भृणहत्या , बालविवाह बंद, एकनिष्ठ तत्वांशी

केले मोकळे आकाश, उंबरठ्यामधले मायीने
स्त्री जीवन झाले पावन, दिले पंख शिक्षणाने 

माये तुझ्या ऋणामधे, माय लेकी सा-या जणी
लीन तुझ्या चरणाशी, झालो सुखी समाधानी 

थोर उपकार माऊलीचे, न फिटणारे ऋण 
दिले पंखात बळ, अभिमान तुझा मनोमन

माझे ग नमन हे ,सावित्री तुझ्या चरणाशी
शिक्षणाचा तुझा वसा , एकनिष्ठ मी त्याशी

No comments:

Post a Comment

 संत पंचमी  वसंत पंचमी |माघ शुद्ध मास| जन्म दिन खास| शारदेचा| देवी सरस्वती |वाक् विलासिनी| आज जन्मदिनी |नमन हे|| विद्येची देवता |पुस्तक धारी...