Monday, 21 July 2025

 पसारा नवा रोज मांडीत आहे


सागर किनारी लाटांचा खेळ 

युगेन युगे कसा चालत आहे

कधी येई भरती ओहोटी कधी

शंख शिंपल्याच्या पाडून राशी

पसारा नवा रोज मांडीत आहे


पर्वतात जन्मास येऊन सरीता

भेटीची ओढ सागराच्या आहे

दरी ,घळई कुठे  धबधबा तर

विशाल त्रिभूज प्रदेशांचा भूवरी

पसारा नवा रोज मांडीत आहे


पौर्णीमेच्या रात्री आकाशी चंद्र

हळूवार मार्ग क्रमीत आहे

पुर्णत्वाने प्रकटून गगनी कसा

निळ्या आकाशी  चांदण्याचा 

पसारा नवा रोज मांडीत आहे


वाहतोय वारा असा अविश्रांत

कधी सोसाट्याचा कधी शांत आहे

पाऊसधारा तो घेऊन येतो

अन् चराचरात चैतन्याचा

पसारा नवा रोज मांडीत जातो

1 comment:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि...