Tuesday, 20 December 2022

संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन


आपल्या नावापेक्षा गाडगे बाबा आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक सुपरिचीत झालेले एक थोर समाजसुधारक म्हणुन आज देखील आदराने ज्यांचे नाव आपल्या ओठांवर येते ते संत गाडगे महाराजांचे.त्या काळी भारतीय ग्रामिण समाजात मोठया प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांमुळे बदल घडुन आला. आज देखील अनेक राजकिय पक्ष आणि सामाजिक संस्था त्यांच्या केलेल्या कार्यातुन प्रेरणा घेत आहेत.गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्हयातील शेणगांव येथे अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका परिट ( धोबी ) परिवारात झाला. गाडगे महाराजांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. त्यांच्या मामांची खुप मोठी शेतजमीन होती. तेथे काम करायला विशेषतः गुरे राखायचे काम त्यांना फार आवडे.

गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर आप्तेष्टांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्यापासुन बनविलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व गाडगे बाबा.

संपुर्ण दिवसभर गावातील स्वच्छता करावयाची, घाण साफ करायची आणि त्याबदल्यात चार घरी पोटापुरते अन्न मागायचे आणि रात्री लोकांच्या मनातील घाण साफ करण्याकरता किर्तन करायचं, त्यातुन समाज प्रबोधन करायचं, समाज कल्याणाचा प्रसार प्रचार करायचा. आपल्या किर्तनात ते संत कबीरांच्या दोहयांचा देखील उपयोग करत असत.

गाडगे बाबा ज्या ही गावात प्रवेश करत ते लगेच गावातील नाल्या आणि रस्ते स्वच्छ करत आणि स्वच्छता झाल्यानंतर गावक.यांना गांव स्वच्छ झाल्याबद्दल शुभेच्छा देखील देत.

सामाजिक प्रबोधनातुन लोकांच्या मनात ज्या अंधश्रध्दा घर करून बसलेल्या आहेत, ज्या अनिष्ट प्रथा, ( बोकड कापणे, कोंबडं कापुन देवाला वाहाणे) लोकांच्या मनातुन उदाहरण देऊन गाडगे बाबा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असत. गावकरी त्यांना गोळा करून पैसे देत त्याचा उपयोग गाडगे बाबा गावाच्या विकासाकरताच करत असत.

गावातुन मिळालेल्या पैश्यातुन गाडगे महाराजांनी अनेक शाळा, धर्मशाळा, रूग्णालयं आणि जनावरांकरता गोशाळा देखील उभारल्या. गाडगे महाराज जनतेला जनावरांवर होत असलेल्या अत्याचारापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. समाजात चालत असलेल्या जातीभेद आणि वर्णभेदाला संपवण्याकरता त्यांनी खुप प्रयत्न केले.
समाजात दारूबंदी व्हावी याकरता सुध्दा बांबांनी बरेच प्रयत्न केले. गाडगे महाराज लोकांना कठोर परिश्रम, सामान्य राहाणीमान आणि परोपकार याला अंगिकारण्याचे धडे देत. महाराजांनी कित्येकदा मेहेर बाबांची भेट घेतली होती. मेहेर बाबांनी देखील गाडगे महाराजांना आपल्या आवडत्या संतामधील एक म्हंटले होते.
गाडगे महाराजांनी मेहेर बाबांना पंढरपुर येथे आमंत्रीत केले होते त्यावेळी 6 नोव्हेंबर 1954 ला हजारो लोकांनी मेहेर बाबा आणि गाडगे महाराजांचे एकत्र दर्शन घेतले होते.

महाराजांनी केलेली महत्वाची कार्य 
ग्रामस्वच्छता
अंधश्रध्दा निर्मृलन
जनजागृती
धर्मशाळा, गोशाळा, रूग्णालयं, शाळा, वसतीगृह यांची उभारणी
गाडगे महाराजांच्या कार्याचा गौरव 
संत गाडगे महाराजांच्या कार्याचा सन्मान करत महाराष्ट्र शासनाने 2000-01 मधे ’’संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची’’सुरूवात केली.
जे ग्रामस्थ आपल्या गावाला स्वच्छ ठेवतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
गाडगे महाराज महाराष्ट्रातील प्रसिध्द समाज सुधारकांमधील एक आहेत.
लोकांच्या समस्या त्यांना कळायच्या, गरीब आणि गरजवंतांकरता ते सतत कार्य करायचे. भारत सरकारने देखील त्यांच्या सन्मानार्थ अनेक पुरस्कार सुरू केले.
अमरावती विद्यापीठाचे नाव देखील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. गाडगे महाराज भारतीय इतिहासातील एक महान संत होउन गेले. ते ख.या अर्थानी निष्काम कर्मयोगी होते. महाराष्ट्राच्या काना कोप.यांत त्यांनी अनेक धर्मशाळा, गोशाळा, विद्यालयं, चिकित्सालयं आणि वसतीगृहांची निर्मीती केली.
त्यांना मिळालेल्या दानातुन, देणग्यांमधुन त्यांनी या सर्व गोष्टींची उभारणी केली परंतु स्वतःकरता एक झोपडी देखील या महापुरूषाने बांधली नाही.
संत गाडगे महाराजांचा दशसुत्री संदेश 
भुकेलेल्यांना… अन्नं
तहानलेल्यांना… पाणी
उघडयानागडयांना… वस्त्रं
गरीब मुलामुलींना… शिक्षणाकरता मदत
बेघरांना… आसरा
अंध अपंग रोग्यांना… औषधोपचार
बेरोजगारांना…रोजगार
पशुं-पक्षी मुक्या प्राण्यांना… अभय
गरीब तरूण.तरूणींचे… लग्नं
गोरगरिबांना… शिक्षण

Monday, 19 December 2022

स्वयंपाक घरातील बुद्धिमत्ता

*....बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?* 😌👩🏻‍🏫

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी - भाजी - वरण - भात - कोशिंबीर - चटणी - उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू - चिवडे - मिठाया - पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का? 

  

- फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

- गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी - जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं? 

- पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?
- एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

- ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?
- प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

- दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

- मीठ, तिखट, साखर किती घालायचं?
- पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?
- उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

- वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे 

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे involvement. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. 

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, प्रसंगी पूर्ण अशिक्षित असुन स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकाच्या हुशारीला आपण दाद कितीवेळा देतो?

 निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. 

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. 

किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. 

खाण्यापूर्वी, दिवसातुन एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.
👍🙏

Friday, 9 December 2022

दिन विशेष 


 मानवी हक्क दिन.

महत्त्वाच्या घटना:

१७९९: ला जगात सर्वात आधी फ्रांसने आजच्या दिवशी मेट्रिक सिस्टम चा उपयोग केला.

१८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.

१८८७: ला आस्ट्रिया, हंगरी, इटली और ब्रिटेन या देशांनी बाल्कन सैन्य करारावर सह्या केल्या.

१९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

१९०२: तस्मानिया मध्ये आजच्या दिवशी महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.

१९०२: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचा जन्म.

१९०३: पियरे क्यूरी और मैरी क्यूरी यांना भौतिक शास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला.

१९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

१९१६: ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९६२: ला नोबेल पुरस्कार विजेता अल्बर्ट लूथली यांनी दक्षिण आफ्रिकी मध्ये वर्णभेद समाप्त करण्याची अपील केली.

१९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.

२०००: ला पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना पाकिस्तान मधून १० वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

कैलाश सत्यर्थी
कैलाश सत्यर्थी

२००२: ला अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी यूनाइटेड एयरलाइंस पूर्णपणे कंगाल घोषित करण्यात आली.

२००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.

२००४: ला अनिल कुंबळे ने कपिल देव ला मागे टाकत कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारे पहिले भारतीय बनले.

२००८: प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.

२०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८७०: सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार (मृत्यू: १९ मे १९५८)

१८७८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)

१८८०: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)

१८९२: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७)

१९०८: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तसेच पुरातत्व विज्ञान मध्ये तज्ञ असलेले हसमुख धीरजलाल संकलीया यांचा जन्म.

१९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.

१९२८: लोक सभेचे सदस्य चंद्रकांत भंडारे यांचा जन्म.

१९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.

१९६०: भारतीय चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा जन्म.

१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू धवल कुलकर्णी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८९६: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर १८३३)

१९२०: होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८)

१९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)

१९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)

१९६४: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)

१९६३: सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)

दिलीप पुरुषोत्तम चित्रे
दिलीप पुरुषोत्तम चित्रे vg`

१९६३: आफ्रिकी देश झांझिबार यांनी आजच्या दिवशी ब्रिटन पासून स्वतंत्र घोषित केले.

१९९२: भारताच्या गुजरात मध्ये पहिली होवरक्राफ्ट सेवा सुरु झाली.

१९९४: यासिर अराफात, यित्जाक रॉबिन आणि शिमोन पेरेज यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९९५: स्वातंत्र्य सैनिक चौधरी दिगंबर सिंह यांचे निधन.

१९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)

अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी
अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी

२००१: अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर १९११)

२००३: श्रीकांत ठाकरे – संगीतकार 

२००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)

Notice

 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि...