Sunday, 26 March 2023

*चंद्र आणि शुक्राची युती*

*चंद्र आणि शुक्राची युती*,
काल दिं .२४ / ३ / २०२३ रोजी चंद्र आणि शुक्राची युती अतिशय सुंदर , विलोभनीय दृष्य पाहण्यास मिळाले . गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आमावस्या होती अमावस्येनंतर  चंद्राची नाजूक कोर उगवते व लगेच मावळतेही त्यानंतर शुक्ल पक्ष तृतीयेला म्हणजेच काल निरभ्र आकाशात चंद्रकोर स्पष्ट दिसत होती . चंद्रकोरच्या खालच्या बाजूस मधोमध शुक्रग्रह चमकत होता. ह्यास शुक्राची चांदणी जी पहाटतारा , शुक्रतारा नावाने ओळखतात .
पहाटे पुर्वेस शुक्रतारा दिसतो , तसेच पाश्चिमेस सायंकाळी दिसतो .
भारतात शुक्र ग्रह ("शुक्र ग्रह") हे शक्तिशाली संत शुक्राच्या नावावर आहे. भारतीय वैदिक ज्योतिषात शुक्राचा वापर केला जातो म्हणजे संस्कृतमध्ये "स्पष्ट, शुद्ध" किंवा "चमक, स्पष्टता" असा होतो. मराठी दिनदर्शिकमध्ये वारामध्ये सुध्दा ग्रहाचे नाव आहे . त्यामध्ये शुक्रवार हा शुक्र ग्रहावरून वारांची नावे आहेत .
नऊ नवग्रहांपैकी एक , शुक्र ग्रह तो संपत्ती, आनंद आणि पुनरुत्पादनावर परिणाम करतो 
शुक्र हे रात्रीच्या आकाशाचे एक प्राथमिक वैशिष्ट्य आहे, आणि म्हणूनच संपूर्ण इतिहासात आणि विविध संस्कृतींमध्ये पौराणिक कथा , ज्योतिष आणि काल्पनिक कथांमध्ये उल्लेखनीय महत्त्व आहे.
सूर्य आणि चंद्रानंतर शुक्र हे सर्वात महत्वाचे खगोलीय ग्रह आहे
शिवाय, लेखक, कवी आणि विद्वानांसाठी शुक्र ही प्रमुख प्रेरणा आहे .
कालचे आकाश दर्शन वेगळाच आनंद देऊन गेला . अतिशय सुंदर विलोभनीय चंद्रकोर त्यांच्या खाली मधोमध शुक्र ग्रह 
छ. शिवाजी महाराजाच्या कपाळावर चंद्रकोर व त्याखालील टिपका दिसतो . हे आकाशातील 
चंद्र व शुक्रग्रहाचे प्रतिक आहे . हिंदू स्त्रियांच्या गोंदणामधे ही चंद्रकोर असते . म्हणजेच अनाधीकाळापासुन मानवास आकाशदर्शनाचे आवड होती . त्यामुळेच पुरुष व स्त्री यांनी आपल्या कपाळावर शृंगारात मानाचे स्थान चंद्रकोर , व शुक्रताऱ्यास दिले गेले असणार .
चंद्राप्रमाणे शितल शुक्राप्रमाणे तेजस्वी आपले व्यक्तीमत्व दिसावे हा त्यामागचा हेतू असावा .
आकाश दर्शनाचा छंद सर्वानी जोपासावा . निसर्ग मुक्तहस्ताने आपणाला देत असतो ते भरभरून घेण्यासाठी  , निसर्गाच्या सानिध्यात  आपले मन रमवले पाहिजे. निसर्गाचा आनंद घ्या . निरोगी रहा .पर्यावरणाचे रक्षण करा
पर्यावरण आपले रक्षण करील ...!

No comments:

Post a Comment

  Mahatma Jyotirao Phule was a prominent social reformer known for his advocacy of education and equality.  Here are some of his famous quot...