Monday 17 July 2023

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्राला थोर समाजसुधारक, विचारवंत, कवी, संत, साहित्यिक अशी परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळकवि.दा. सावरकरसंत तुकाराम अशी अनेक रत्ने आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आहेत. यांतील प्रत्येकाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु अशी कुठली व्यक्ती आहे जी या सर्व उपाध्या धारण करू शकते? कुठली एक अशी व्यक्ती आहे जिने या सर्व क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान दिले आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे.

लोकशाहीर म्हटलं कि सुरुवातीला आठवणारं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

“जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव”

समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले.

नाव (Name)तुकाराम भाऊराव साठे (Tukaram Bhaurao Sathe)
जन्म (Birth)१ ऑगस्ट १९२० (1st August 1920)
टोपण नाव (Nick Name)अण्णाभाऊ (Annabhau)
जन्मस्थान(Birth Place)वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली (Vategaon, Tq. Valva, Dist. Sangali)
वडील (Father Name)भाऊराव (Bhaurao)
आई (Mother Name)वालबाई (Valbai)
शिक्षण (Education)अशिक्षित (Uneducated)
पत्नी (Wife Name)कोंडाबाई आणि जयवंताबाई (Kondabai and Jayvantabai)
मृत्यु (Death)१८ जुलै १९६९ (18th July 1969)

१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. त्यांच्या बहिणीचे नाव जाईबाई असून भावाचे नाव शंकर भाऊ साठे असे आहे. अण्णाभाऊ यांनी दोन विवाह केले.

त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता असे होते. त्यांना एकूण तीन अपत्ये असून त्यांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला अशी आहेत. अण्णाभाऊ यांचे मूळ नाव तसे तुकाराम परंतु संपूर्ण जग त्यांना अण्णाभाऊ या टोपणनावानेच ओळखते. भाऊंचे शिक्षण तसे झालेले नव्हते, परंतु तरीही कठोर प्रयत्नांतून त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केले.

मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली.

“गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची”

आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले.

तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय भाऊंना जाते. तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची ‘वैजयंता’ हि कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटीशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारी ‘फकीरा’ ह्या त्यांचा काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.

त्यांच्या ‘फकीरा’ या कादंबरीला १९६१ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळालेला आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन हे अण्णाभाऊ यांची विशेषता. शिवाय ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना कळेल अशा भाषेत त्यांनी पोवाडे, लावण्या व गीते लिहिली.

अण्णाभाऊ साठे यांच्या काही खास कविता 

“माझी मैना गावावर राहिली,

माझ्या जीवाची होतीया काहिली”

“दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक

दे शेजाऱ्याला, रे शिवारी चला”

“रवी आला लावूनी तुरा,

निघाली जिंदगी भरभरा

दीप गगनाच्या डोईवर लागला,

ढग तिमिराचा त्यानं

निवारिला झाले आकाश लाल,

                                                               बघ उधळी गुलाल रानारानात हर्ष पसरला,

आला बहार गुलमोहरा”

“एकजुटीचा नेता झाला कामगार तैय्यार बदल्या रे

दुनिया सारी दुमदुमली ललकार”

लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्या

  • आबी,गुलाम,जिवंत काडतुसे,पाझर रानगंगा,वारणेचा वाघ,वैर,फकीरा,वैजयंता,चिखलातील कमळ,माकडीचा माळ,चंदन इ.
  • अण्णाभाऊ साठे यांचे कथा संग्रह
  • कृष्णा काठच्या कथा,गजाआड,नवती,खूळंवाडा,आबी,पिसाळलेला माणूस,फरारी,बरबाद्या कंजारी,निखारा,चीरानगरची भूतं इ.
  • अण्णाभाऊ साठे यांचे लोकनाट्य : बेकायदेशीर,लोकमंत्र्यांचा दौरा,पुढारी मिळाला,देशभक्त घोटाळे,कापऱ्या चोर,अकलेची गोष्ट,शेटजींचे इलेक्शन इ.

  • अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली पुस्तके: अमृत,गुऱ्हाळ,तारा,रानबोका,आघात इ

Friday 14 July 2023

कुपी सुगंधाची


कुपी सुगंधाची 

सुगंधाची किमया औरच असते. सुगंधाची पहिली ओळख झाली ती पारिजातकाशी. लहानपणापासून अंगणी बहरलेला पारिजातक अंगावर मोतीपोवळे घेऊन उभा पाहिलेला. पहाटेला ही सुगंधाची कुपी भरभरून ओसंडत असे, आणि हा मोतीपवळ्यांचा सडा शेणाने शिंपलेल्या अंगणात पडे.ते टपोरे फुल रात्री उमले व सकाळी झाडावरून गंधासह ओघळून जमिनीवर एक गंधित सडा घाले.चार महिने चातुर्मासात कितीतरी शेजाऱ्यांनी गोपाळकृष्णाला या फुलांनी लाखोली वाहिली असेल. श्रावण मंगळागौरीचा महादेवाचा चौरंग या पारीजातकानेच सुशोभित होई. पारिजातक तर कमालीचा निरिच्छ वृक्ष. फारशी जोपासना न करता ही तो भरभरून देतो.आपल्या अंगाखांद्यावर हा सुगंधाची झुंबरचं बाळगतो म्हणाना. मोठा उदार वृक्ष. आपले सारे काही उधळून देणारे हे झाड. देणं हे असं पारिजातकासारखं असावं भरभरून देणारा हा वृक्ष.

जसजसे वय वाढत गेले तसतसे या झाडाफुलांनी, सुगंधानी वेडच लावले. पारिजातकाप्रमाणे दारची जाई, जुई, चमेली, मोगरा आपल्या मोहक, मादक सौंदर्याने आणि सुगंधाने मला वेडं करुन गेली. हाताच्या ओंजळीत ही पांढरीशुभ्र फुले घेऊन ती ओंजळ नाकाशी धरून हुंगत राहण्याचा जणू छंदच! फुले खाली ठेवून झाल्यावर ही रिकामी ओंजळ गंधाळून जाई.हे सामर्थ्य त्या शुभ्र वर्णी गंधित फुलांचं. असाच शुभ्र वर्ण घेऊन आलेलं दुसर गंधानी वेड लावणार फुल म्हणजे चाफा. पाच पाकळ्यांचं टपोरं फुलं. मधला भाग पिवळसर आणि धुंद करणारा मंद गंध. 
पिवळ्या रंगावरून आठवला पिवळाचाफा. व्वा!गंधांची कुपिच जणू! अलवार सौंदर्य व प्रेमात पडावा असा सुगंध. मनी न मावणारा आनंदच!

लहानपणापासून माझ्यातल्या फुलवेडीला या सुगंधाचे कोण आकर्षण! आपल्या गंधाने आकर्षित करणारा केवडा, रातराणी, मधुमालती, निशिगंध आणि हो बकुळ तर विचारूच नका! या सर्व फुलांचे आगळेवेगळे सौंदर्य व गंध रसिक मनाला भुरळ न घालेल तरच नवल! 
हा झाला फुलांचा गंध पण काही झाडंही गंधवेड पांघरून जन्माला येतात. मागच्याच आठवड्यात कढीपत्ता फुलला होता. एवढा फुलोरा आला की बस! येता जाता त्याच्या सुगंधाने क्षणभर झाडाजवळ थांबूनच पुढे सरकत असे. कडुलिंबाला सुद्धा फुलं आली की पाडव्याच्या वेळी मस्त सारे झाड गंधित होते. आंब्याच्या मोहराचं गंध तर विचारूच नका केंव्हाच त्यांनी आपल्या नाकाचा ताबा घेतलेला असतो. मला खूप नवल वाटतं या साऱ्या फुलणा-या गंधाळणाऱ्या झाडांचं. आपला सुगंध हातचं न राखता ती उधळून टाकतात.

 प्रेमी जीवाला या गंधाने आकर्षित केले नाही तर नवलच ! म्हणूनच तर...

 "गंध फुलांचा गेला सांगून' 
"तुझे नि माझे व्हावे मिलन"

 या निसर्गाच अस मानवी जीवनाशी, जगण्याची घट्ट नातं बरं का!

गुलाब, शेवंतीविषयी मी नाही लिहिलं तर ती माझ्यावर रुसतीलच! देशी गुलाबाचं सौंदर्य आणि त्याचा सुगंध असाच त्याच्या प्रेमात पडायला लावतो. तीच गोष्ट शेवंतीची.

 वृंदावनातली तुळशीबाई हाताच्या स्पर्शाने हलली तरी गंध पसरवते. तिचा सहवास तर नक्कीच हवा.
अरे हो, विसरलेच! परिपक्व झालेल्या फळांचा गंध तर मला क्षणोक्षणी बोलावतो. अढीतला आंबा पिकला आहे हे बघून नाही तर त्याच्या गंधाने लक्षात येतं.आधी गंध शोषला जातो आणि नंतर मधुर रसाने रसना तृप्त होते. या माझ्या बागेतल्या केशर आंब्याचे कौतुक त्याच्या रसरंगगंधाचे किती करू तेवढे थोडेच आहे. 
( एकदा याच चाखायला ) असच म्हणेन!
रसरंगगंधाच हे वैविध्य. एक दुसऱ्या सारखा नाही. खरंच तो किमयागार हे सारं घडवून आणतो. मनात जपलेली बकुळ समोर नसली तरी माझ्यापर्यंत गंध पोचवते. उंचचउंच आकाशाशी स्पर्धा करणारे बुचाचे फुल त्यांच्या सहवासाने शाळकरी वयात काही वर्षे लांब दांड्याची फुले वेचून तिपेडी वेणी गुंफण्यात व गंध हुंगण्यात गेली त्याला मी कसे विसरू? ही सारी "गंधमाया" माझ्या जगण्याचा अविभाज्य अंग आहे. या सार्‍या गंधकुप्या हृदयात जपून ठेवल्यात. त्याच मला ऊर्जा देतात प्रफुल्लित ठेवतात.

गंधवेड्या मनाला वैशाखात तप्त उन्हाने तापलेल्या धरणीवर पावसाचे थेंब पडून येणारा मृद्गंध असाच वेडावतो. त्याला मी पकडून ठेवते. अगदी आत पर्यंत श्वास घेऊन डोळे झाकून साठवून ठेवते. हा गंध जलधारा व धरतीच्या मिलनाचा.

 असाच एक गंध खेडेगावात मी अनुभवलेला तिन्हीसांजेला रानातून गुरे घरी येताना त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा नाद व पायांनी धूळ उडवीत जातात त्यालाही एक गंध असतो. गुरांच्या गोठ्यातला गंध तसाच त्यांच्या विश्वात सामावून ठेवणारा. मंदिराच्या गाभार्‍यातला गंध तर विचारूच नका! धुपदीप नैवैद्याने आणि साक्षात परमेश्वराच्या गळ्यातल्या सुगंधी फुलांनी भरून गेलेला गाभारा. आपल्या मनगाभाऱ्यालाही प्रसन्न ठेवतो. अशीही गंधांची दुनिया तिच्या मोहात पाडून आपल्याला सारे विसरायला लावते. 

निसर्ग, सकाळ-दुपार-संध्याकाळ यांचही गंधाशी नातं आहे. त्यांच्याशी जवळीक साधली तर नक्की ते उमजेल.

 कार्यालयातल्या कार्यक्रमांनाही गंध असतो बरं का! लग्नकार्यात कार्यक्रमाच्या गंधा बरोबरच मुदपाकखान्यातला गंध रसनेला तृप्त करतो. 
फार काय गंध प्रेमाला असतो, जगण्याला असतो, रागालोभाला, सुखदुःखाला, गरीब-श्रीमंतीला एक वेगळाच गंध असतो. 
एकूणच या गंधांच नातं जीवनाला वेढलेलं. पण मला नेहमीच खेचून घेणारा गंध तृप्तीचा,आनंदाचा.

नुकत्याच आंघोळ घालून, दुपट्यात गुंडाळून झोपवलेल्या बाळाने जांभई देत पाळण्यात आवाज करावा त्याच्या जवळपास गेलात तर त्याच्या जावळाचा, त्याच्या काजळाचा, तेलाने माखलेल्या अंगाचा जो गंध आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. असा हा गंध नेहमीच मनाला आनंद देणारा.तसाच आईच्या पदराचाही.



Wednesday 12 July 2023

जल , जंगल , जमिन वाचवा

एक व्यक्ती २४ तासात २७ हजार वेळा  श्वासोच्छवास घेतो. त्यासाठी त्याला दररोज ३ कीलो आॕक्सिजनची गरज भासते.

ती गरज पुर्ण करण्यासाठी 
७ मोठ्या वृक्षांची गरज असते. 
३ किलो आॕक्सिजनची बाजारातील किंमत वर्तमान  बाजारभावानुसार २१०० /- रु आहे.

जर एक व्यक्ती आपले आयुष्य ६५ वर्षे जगला तर तो या निसर्गातून ५ कोटी रुपयाचा आॕक्सिजन मोफत वापरतो.
मोबदल्यात स्वतःच्या श्वासोच्छवासा साठी लागणारे 
७ झाडे सुध्दा लावत नाहीत,उलट 
मृत्यूनंतर अग्निसंस्कारासाठी लागणाऱ्या 
९ मण (३६० किलो )  लाकडासांठी एका मोठ्या वृक्षाचा बळी दिला जातो. विचार करा जेवढी आपली आयुष्यातील एकूण मिळकत नसते तेवढ्या कोटी रुपयाचा आॕक्सिजन आपण निसर्गातून मोफत वापरतो पण त्याची परतफेड आपण कधीच करीत नाही,पाण्याचा हिशोब केला तर तो सुध्दा एवढाच येतो. 

परतफेड करायला शिका. झाडे लावा झाडे जगवा. पाणी वाचवा पाणी अडवा पाणी जिरवा.तुम्ही जगा आणि पुढच्या पिढ्यांना पण जगू द्या.   👍🏻👍🏻👍🏻

*या पावसाळ्यात किमान 5 झाडे  लावा ही आग्रहाची विनंती. आपल्या 100 forward मधुन 50 तरी मनावर घेतील.*
पेड है तो भावी जिवन है 🌳
पेड लगाकर उसे बढाव 🌳
जल है तो कल है 💧🌳🙏
जल , जंगल , जमिन वाचवा येणार जिवनाचा आनंद घ्या 
🙏🌳💧🌹

Tuesday 11 July 2023

बॅग कशी भरायची ?*

*बॅग कशी भरायची ?*

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी 
 *बॅग कशी भरायची ते* 
 *आता मला कळले आहे !* 
फापट पसारा आवरून सारा , 
आता सुटसुटीत व्हायचं  आहे  !

याच्या साठी त्याच्या साठी , 
हे हवं , ते हवं 
इथे तिथे - जाईन जिथे , 
तिथलं काही नवं  नवं 
हव्या हव्या चा हव्यास आता 
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 
बॅग हलकी स्वतः पुरती 
आता फक्त ठेवायची आहे ! 
 *बॅग कशी भरायची ते* 
 *आता मला कळले आहे !* 

अपेक्षांच्या ओझ्याखाली 
आजवर त्रस्त होते
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये 
काय काय कोंबत होते !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होते
काय राहिलं, कुठे ठेवलं 
आठवून आठवून पाहत होते

त्या त्या वेळी ठीक होतं 
आता गरज सरली आहे, 
कुठे काय ठेवलंय ते ते 
आता विसरून जायच आहे 
 *बॅग कशी भरायची ते* 
 *आता मला कळले आहे !* 

खूप जणांनी खूप दिलं 
सुख दुखाःचं भान दिलं 
आपण कमी पडलो याचं 
*शल्य आता विसरायचं आहे !*

मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
 *बॅग कशी भरायची ते* 
 *आता मला कळले आहे !* 

आत बाहेर काही नको 
आत फक्त एक कप्पा, 
जना - मनात एकच साथी 
सृष्टी करता एकच देवबाप्पा ! 

सुंदर त्याच्या निर्मिती ला 
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत 
*अलगद विरक्त होत जायचं आहे .*

*बॅग कशी भरायची ते* 
*आता मला कळले आहे!*

Wednesday 5 July 2023

 तुम्ही एकही झाड लावू नका. 

  ती आपोआप उगवतात 

तुम्ही फक्त ती तोडू नका...


तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका.              

ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते.

तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका...


तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका, 

सर्वत्र शांतताच आहे.

तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका...


तुम्ही प्राणी वाचवण्याचा

 प्रयत्न करण्याची गरज नाही.

फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका...


तुम्ही माणसाचे व्यवस्थापन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नका. 

सर्व व्यवस्थितच आहे.

फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित रहा...

श्रावण

*श्रावण....🔸* *तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे स...